मोठा दावा…राज्यात नोव्हेंबरनंतर महाविकास आघाडीचाच असेल मुख्यमंत्री !

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त फटका बसला असून, महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुतीची जिरविण्यासाठी महाविकास आघाडी उत्साहित झाली आहे. दरम्यान, राज्यात नोव्हेंबरनंतर महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल, असा दावा आता एका मोठ्या नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ( Maharashtra Politics )

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आमनेसामने आली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यांना कोंडीत पकडण्याची एक देखील संधी आतापर्यंत सोडलेली नाही. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी तर थेट शिक्षकांना पैसे वाटप केले जात असल्याचा जळगावमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चांगलीच खळबळ उडवून दिली. तशात आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना इतके दिवस शिक्षकांचे प्रश्न का सोडवले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय नोव्हेंबरनंतर राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असणार आहे. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर सर्वच प्रश्न सोडवले जातील, असा दावा सुद्धा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत बोलत होते. शिक्षक पेन्शन संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनावर देखील खासदार राऊत यांनी हल्लाबोल केला. “नाशिकमध्ये मुख्यमंत्री कशासाठी आले होते? त्यांचा आणि शिक्षणाचा संबंध पाहिजे. राज्यात आजपर्यंत शिक्षणाचा एवढा मोठा बाजार झाला नव्हता. मात्र, आता हातात कटोरे देऊन शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. पैशांची ताकद सत्ता टिकवण्यासाठी लागते. पण शिक्षकांच्या स्वाभिमानाचा कुणीही लिलाव करू शकत नाही”, असेही खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button