Maharashtra Closed : बदलापूरच्या घटनेचे तीव्र पडसाद; महाविकास आघाडीचा येत्या शनिवारी महाराष्ट्र बंद !

Maharashtra Closed : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्ष आता आक्रमक झाले आहेत. बदलापूरमधील घटनेचे राज्यभर पडसाद सुद्धा उमटत आहेत. दरम्यान, उबाठा, काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने येत्या शनिवारी (ता.२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Maharashtra Closed : Badlapur incident has severe repercussions; Mahavikas Aghadi will close next Saturday in Maharashtra!

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजनेऐवजी महिला सुरक्षा योजना राबवावी, असा सल्ला देखील त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे नामक आरोपीला न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे काल मंगळवारी बदलापुरात आंदोलकांनी दिवसभर रेल्वे रोखून धरली होती आणि त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला होता. पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली होती.

गाजावाजा झालेल्या लाडकी बहीण योजनेवर फेरले पाणी

बदलापूर घटनेवरून उबाठा, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आता चांगलीच आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीने या प्रकरणी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. याशिवाय येत्या शनिवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापूर प्रकरणामुळे महायुतीची मोठी कोंडी झाली असून, राज्यातील महिलांसाठी मोठा गाजावाजा करत जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सुद्धा त्यामुळे पाणी फेरले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button