राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई-कॉमर्सचा मंच
'महा ॲग्रो मार्ट' ॲपचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनावरण
Maha Agro Mart : राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई-कॉमर्सचा मंच मिळाला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या ‘महा ॲग्रो मार्ट’ ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईत झाले. या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार व टपाल विभाग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी देखील करण्यात आली.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अपद्वारे केला आहे. देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झाली असून त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला आहे. भारतातील ई-कॉमर्स भविष्यात $250 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाइल ॲप आणि वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महा ॲग्रो ॲपच्या माध्यमातून शेतकरी, बचत गट, स्टार्ट अप, छोटे-मोठे उद्योग आणि शेतकरी कृषी उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने आणि शेतीशी संबंधित उत्पादने ऑनलाइन विकू शकतील, त्यामुळे एक नवीन युग सुरू झाले आहे.”
‘महा ऍग्रो मार्ट’ या नावाने हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे
ॲप लॉन्च करताना 358 उत्पादकांकडील 1370 उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली होती. या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहितीही उपलब्ध होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत विविध प्रकारच्या शेतमालाच्या दैनंदिन किमतीही या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महा ऍग्रो मार्ट या नावाने हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. यासह फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून 1370 उत्पादने खरेदी करता येतील तसेच ऑनलाइन पेमेंटही करता येईल.
Maha Agro Mart ॲप असे डाउनलोड करा
- प्ले स्टोअरमध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे.
- ॲप डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लीक करा