जळगाव आणि रावेरमध्ये भाजप उमेदवारांनी घेतली एवढ्या मतांची आघाडी !
जळगाव टुडे । जळगाव तसेच रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे. तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे करण पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील हे पिछाडीवर पडल्याचे दिसून आले आहे. (Loksabha Election Result)
प्राप्त माहितीनुसार जळगावमधून स्मिता वाघ यांना आतापर्यंत 87, 094 मते मिळाली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी करण पाटील यांना 45, 873 मते मिळाली आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसे यांना 1,00,230 मते मिळाली आहेत, तर श्रीराम पाटील यांना 57,019 मते मिळाली आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. भाजप नेते गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे या दोन नेत्यांनी जळगाव व रावेरच्या जागेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.