बारामतीत सुप्रिया सुळे 11 हजार मतांनी पुढे, सुनेत्रा पवार मागे पडल्या !
जळगाव टुडे । अटीतटीच्या लढतीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुमारे 11 हजार मतांची आघाडी घेतली आहे, तर अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या मागे पडल्या आहेत. नणंद आणि भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याशिवाया काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी या जागेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. (Loksabha Election Result)
दुसरीकडे सोलापुरात पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे 5151 मताने आघाडी घेतली असून राम सातपूते पिछाडीवर पडले आहेत. संभाजीनगरात इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. तर चंद्रकांत खैरे, आणि संदीपान भुमरे पिछाडीवर पडले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिली फेरी संपल्यानंतर शिवसेना शिंदे गट सदाशिव लोखंडे – 3937 उद्धव ठाकरे सेनेचे – भाऊसाहेब वाकचौरे – 3584 तर वंचितच्या उत्कर्ष रूपवते – 650 मते मिळाली आहेत. यात लोखंडे 353 मतांनी आघाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार) 18254, सुजय विखे (भाजप) 18444 मते मिळाली आहेत. सुजय विखे 190 मतांनी आघाडीवर आहेत.
नंदुरबारमध्ये पहिल्या फेरीत काँग्रेस गोवाल पाडवी 18500 मतांनी आघाडीवर आहेत. रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या 8783 मतांनी आघाडीवर आहेत. बीड लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. पहिल्या फेरीमध्ये 1359 मतांनी बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे.