शरद पवारांची आजच दुपारी पत्रकार परिषद; भाजपच्या छातीत भरली धडकी !

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणूक निकालातून देशात इंडिया आघाडीने तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. खुद्द बारामतीत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर मात केली आहे. दरम्यान, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे दुपारी तीनला पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामाध्यमातून ते काय बोलतात, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या तर छातीत धडकीच भरली आहे. ( Loksabha Election Result)

राज्यात महायुतीच्या विरोधात जंग पुकारणाऱ्या महाविकास आघाडीने 48 पैकी तब्बल 28 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. 45 चा आकडा पार करण्याची भाषा करणाऱ्या महायुतीला 20 चा आकडा देखील महाविकास आघाडीने गाठू दिलेला नाही. वैयक्तिक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 पैकी 08 जागांवर आघाडी मिळवली आहे. बारामतीत देखील सुप्रिया सुळेंनी त्यांच्या भावजय सुनेत्रा पवार यांना मात दिली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंतच्याआकडेवारी नुसार देशात एनडीएला 290 जागांची आघाडी मिळाली आहे, तर इंडियाला 220 जागांची आघाडी मिळाली आहे. बहुमताचा आकडा 272 असल्याने भाजपला बहुमत मिळताना दिसत असले तरी इंडिया आघाडी देखील सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते, असे बोलले जात आहे. जागा कमी पडल्यास तृणमूल काँग्रेस आणि जदयू यांनाही सोबत घेतले जाऊ शकते. यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेला खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत ते काय बोलतात त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button