जळगावमधून स्मिता वाघ यांनी घेतली 1 लाख 64 हजार मतांची निर्णायक आघाडी !
जळगाव टुडे । लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांना आतापर्यंत सुमारे 4 लाख 26 हजार 092 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना 2 लाख 61 हजार 898 मते मिळाली आहेत. त्यामुळे स्मिता वाघ यांनी सुमारे 1 लाख 64 हजार 194 मतांची आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. ( Loksabha Election Result)
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी प्रत्येक फेरीत घेतलेली आघाडी दुपारी एक वाजेपर्यंत कायमच होती. मतमोजणीच्या आकडेवारीवर नजर मारल्यावर श्रीमती वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात करण पवार यांच्यापेक्षा दीडपट ते दोनपट जास्त मते मिळाली आहेत. विशेषतः एरंडोल, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी मोठी आघाडी घेतली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी दरम्यान श्रीमती वाघ यांचे मताधिक्य आणखी वाढते की कमी होते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.