राहुल गांधी रायबरेलीमधून लढणार, आजच घोषणा आणि आजच अर्ज दाखल करणार | Loksabha Election

Jalgaon Today : काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढणार म्हणून इतके दिवस अनेकांना उत्कंठा लागली होती. काँग्रेसने देखील त्याबाबतीत इतके दिवस संस्पेन्स कायम ठेवला होता. शेवटी आज शुक्रवारी (ता.03) सकाळी तातडीने रायबरेली मतदारसंघासाठी राहुल गांधी यांचे नाव फायनल करण्यात आले. त्यानुसार राहूल हे आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एएनआयने त्यासंदर्भात अधिकृत वृत्त दिले आहे.

शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना, काँग्रेसने रायबरेली आणि अमेठी या दोन महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले. त्यानुसार राहुल गांधी हे रायबरेलीमधून तर के.एल.शर्मा हे अमेठीमधून त्यांचे उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार आहेत. आधीच काँग्रेसने दोन्ही मतदारसंघातील उमेदवार घोषीत करण्यात खूप उशीर केला आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या उमेदवारीने रायबरेली मतदारसंघात नवा ट्वीस्ट निर्माण झाला असून, तेथील निवडणूक मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडण्याचे संकेत मिळाले आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button