याला म्हणतात पक्षनिष्ठा ! पूनम महाजन यांनी तिकीट कापल्यानंतरही मानले नरेंद्र मोदींचे आभार

Jalgaon Today : पक्षाने एकदा संधी दिल्यानंतरही दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेले काहीजण लगेचच दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतात. मात्र, उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी यावेळी तिकीट कापले गेल्यानंतरही आकाडतांडव न करता उलट गेल्या दहा वर्षात आपल्याला लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार ट्वीटच्या माध्यमातून मानले आहेत. (Loksabha Election)

उत्तर-मध्य मुंबईतील चुरस लक्षात घेता काँग्रेसने त्या मतदारसंघात यावेळी वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने देखील ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना त्याठिकाणची उमेदवारी देऊन सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, आपले तिकीट कापले गेल्यानंतर पूनम महाजन यांनी नाराजी वगैरे व्यक्त न करता पक्षाच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. “पक्षाने मला खासदार म्हणून नाही, तर मुलीप्रमाणे स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची, जनतेची नेहमी ऋणी राहिल. आशा करते की, आपले नाते कायम टिकून राहिल”, असेही पूनम महाजन यांनी म्हटले आहे.

”माझे दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन यांनी मला ‘राष्ट्र प्रथम’ हा मार्ग दाखवला, त्याच मार्गावरून मला आयुष्यभर चालता यावे,अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल”, अशा भावना देखील पूनम महाजन यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button