नाते रक्तापलीकडचे…नणंद स्मिता वाघांच्या प्रचाराचे आव्हान जेव्हा स्वीकारतात सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण !

Jalgaon Today : निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवाराच्या प्रचाराची आघाडी त्यांचे अख्खे कुटुंब सांभाळताना दिसून येते. मात्र, चाळीसगावात रक्तापलीकडचे नाते असलेल्या नणंदेच्या लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Election) प्रचाराची धुरा आमदारांच्या सौभाग्यवतींनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक एकपासून प्रचार रॅलीचे नियोजनबद्ध आयोजन करून स्मिता वाघांच्या प्रचाराचे अर्धेअधिक काम त्यांनी आटोपून देखील टाकले आहे.

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेत चाळीसगाव शहरातील विविध प्रभागात घरोघरी जाऊन महिला व पुरुष मतदारांशी संवाद साधण्याचे काम प्रतिभा चव्हाण सध्या धडाडीने करत आहेत. अर्थातच, त्यांच्या रूपाने लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ या स्वतः आपल्या दारी आल्याप्रमाणे त्यांचे सर्व थरातील मतदारांमधून उत्स्फूर्त स्वागत देखील केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देतानाच, चाळीसगाव शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून मार्गी लागलेल्या तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती देण्यासही त्या विसरत नाहीत.

चाळीसगाव शहर व पंचक्रोशीत गेल्या चार वर्षांपासून शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबवून प्रतिभा चव्हाण यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. प्रत्येक दिवस फाऊंडेशनच्या उत्कर्षासाठी खर्च करत असताना, अंत्योदयाचा ध्यास घेताना शोषीत, पीडीत, उद्यमशील व गरजू महिलांना त्यांनी नेहमीच बळ दिले आहे. शहीद जवानांप्रती असणारी बांधिलकी असो की महिला सक्षमीकरण त्यात त्यांनी मोठे काम करून दाखवले आहे. त्यांच्या वेगळ्या कार्याची दखल घेऊन ‘लोकमत’ने सुद्धा “ग्लोबल सखी अचिव्हर्स” पुरस्काराने त्यांचा सिंगापुरच्या भूमीत गौरविले आहे. शेती सिंचन असो की फायटर वूमनचा सन्मान प्रत्येक गोष्टीत शिवनेरीची मुद्रा त्यांच्यामुळे कोरली गेली आहे.

मतदारांच्या मनात नरेंद्र मोदींसाठी वेगळी जागा
चाळीसगाव शहरात प्रचार करत असताना प्रकर्षाने माझ्या हे लक्षात आले की, प्रत्येकाच्या मनात नरेंद्र मोदींनी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी जागा कोरून ठेवली आहे. मोदीजी स्वतःसाठी नाही तर आमच्यासाठी काम करत आहेत, आमचं जीवन सुरक्षित व सुसह्य बनवत आहेत. त्यामुळे आमचे मत विकासाला म्हणजेच मोदीजींनाच असेल, असा आशावाद मतदारांमधून व्यक्त होत आहे.
-प्रतिभा मंगेश चव्हाण, चाळीसगाव.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button