राज्यातील लोकसभेच्या आठ मतदारसंघात सकाळी नऊपर्यंत 7.45 टक्के मतदान

Jalgaon Today : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी (ता.26) मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार आठही मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान झाले होते.

निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार, सकाळी नऊ वाजेपर्यंत अकोल्यात सरासरी 7.17 टक्के, वर्ध्यात 7.18 टक्के, यवतमाळ-वाशिममध्ये 7.23 टक्के, अमरावतीमध्ये 6.34 टक्के, नांदेडमध्ये 7.23 टक्के, हिंगोलीत 7.23 टक्के, परभणीत 9.72 टक्के आणि बुलडाण्यात 6.61 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील मतदार अन्नदात्या शेतकऱ्यांना जीवंत ठेवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावतील, असे बच्चू कडू यांनी बोलून दाखवले. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या परभणी जिल्ह्यातील पाथरवाला गावी जाऊन सपत्निक मतदान केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनीही अकोला मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मतदान केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button