भाजपच्या दुसऱ्या यादीत जळगावमधून स्मिता वाघ यांचे नाव, रावेरमध्ये रक्षा खडसेंना पक्षाकडून पुन्हा संधी

Loksabha Election : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार जळगावमध्ये स्मिता वाघ यांना तिकीट मिळाले आहे, तर रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तसेच धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे आणि नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. तर नागपूर मधून नितीन गडकरी यांचे नाव नाही जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुण्यातून अपेक्षेप्रमाणे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवार देण्यात आली आहे. मुंबई उत्तर मधून पियुष गोयल हे भाजपचे उमेदवार असतील.

उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना संधी
लोकसभेच्या गेल्या वेळी पार पडलेल्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना मिळालेले तिकीट ऐनवेळी कापून उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही स्मिता वाघ यांनी पक्षाचे काम प्रामाणिक केले. त्यामुळे त्यांचा विचार यावेळी भाजप पक्षश्रेष्ठींनी केला आहे. श्रीमती वाघ यांना जळगावमधून उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या रूपाने भाजपने जळगाव जिल्ह्यातून दोन महिलांना लोकसभेत पाठविण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या 20 उमेदवारांची यादी
■ जळगाव- स्मिता वाघ
■ रावेर – रक्षा खडसे
■ नंदुरबार- डॉ. हिना गावित
■ जालना- रावसाहेब दानवे
■ बीड पंकजा मुंडे
■ पुणे- मुरलीधर मोहोळ
■ सांगली – संजयकाका पाटील
■ माढा- रणजीत निंबाळकर
■ धुळे – डॉ. सुभाष भामरे
■ उत्तर मुंबई- पियुष गोयल
■ उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
■ नांदेड- प्रतापराव चिखलीकर
■ अहमदनगर- सुजय विखे पाटील
■ लातूर- सुधाकर श्रृंगारे
■ दिंडोरी- भारत पवार
■ भिवंडी- कपिल पाटील
■ वर्धा – रामदास तडस
■ नागपूर- नितीन गडकरी
■ अकोला- अनुप धोत्रे
■ चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

WhatsApp Group

Related Articles

Back to top button