राज्यात लोकसभेच्या पाच मतदारसंघात दुपारी तीनपर्यंत सरासरी 44 टक्के मतदान

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील रामटेक, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघांसाठी आज शुक्रवारी (ता.19) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, सकाळी सात ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाचही मतदारसंघात सरासरी 44.12 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.

निवडणूक यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील पाचही मतदारसंघात 32.36 टक्के मतदान झाले होते. त्यानुसार भंडारा- गोंदियात 34.56 टक्के, चंद्रपूरमध्ये 30.96 टक्के, गडचिरोली- चिमूरमध्ये 41.1 टक्के, नागपूरमध्ये 28.75 टक्के आणि रामटेकमध्ये 28.73 टक्के मतदान झाले. मतदानाची सर्वाधिक टक्केवारी आदिवासी बहुल गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात नोंदवण्यात आली.

दुपारी तीनपर्यंत रामटेकला 40.10 टक्के, नागपूरला 38.43 टक्के, भंडारा- गोंदियात 45.88 टक्के, गडचिरोली- चिमूरमध्ये 55.79 टक्के आणि चंद्रपूरमध्ये 43.48 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, नक्षलग्रस्त गडचिरोली येथे दुपारी तीन वाजताच मतदान प्रक्रिया आटोपण्यात आली. यावेळी गडचिरोली प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडक मतदार तसेच वृद्ध व दिव्यांग मतदारांची वाजतगाजत मिरवणूक काढली होती.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button