रावेर, जळगावच्या जागेसाठी रक्षा खडसे आणि उन्मेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

Loksabha Election : भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी आज मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 25 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामाध्यमातून नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे तसेच जळगावमधून उन्मेश पाटील आणि रावेरमधून रक्षा खडसे यांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी केव्हा जाहीर होते, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण त्यात महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गट हे देखील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपची दुसरी यादी मंगळवारी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यात जळगाव तसेच रावेर व महाराष्ट्रातील अन्य 23 लोकसभा उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण राज्याचे लक्ष भाजपच्या दुसऱ्या यादीकडे लागले आहे.

उन्मेश पाटील, रक्षा खडसेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत
भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे. याशिवाय बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भारती पवार, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जळगावमधून खासदार उन्मेश पाटील आणि रावेरमधून रक्षा खडसे यांना पक्षाकडून यावेळी पुन्हा संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button