लोकसभा निवडणुकीत राज्यातील साडेपाच हजार तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क

Loksabha Election : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सन 2014 पासून तृतीयपंथींना मतदानाचा हक्का मिळालेला असताना, यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राज्यातील सुमारे 5 हजार 617 तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी सर्वात जास्त 1279 तृतीयपंथी मतदारांची नोंद एकट्या ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. मुंबई उपनगरात 812 तसेच पुण्यातही 726 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पहिल्यांदा सन 2014 च्या निवडणुकीत पुरूष, स्त्री आणि तृतीयपंथी अशी मतदारांची वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार 2014 मध्ये महाराष्ट्रात 918 तृतीयपंथी मतदार आढळून आले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत म्हणजेच सन 2019 मध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 2086 इतकी होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 4 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात आलेल्या नोंदीनुसार राज्यातील तृतीयपंथी मतदारांची संख्या सुमारे 5 हजार 617 इतकी झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, यावेळी ठाणे जिल्हयात सर्वाधिक 1 हजार 279 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई उपनगरात 812 आणि पुण्यात 726 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. तसेच गोंदियामध्ये 10, गडचिरोलीत 9, हिंगोलीमध्ये 7, भंडाऱ्यात 5 आणि सिंधुदुर्गमध्ये 1, अशी तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button