भाजपचे जळगाव, रावेरमधील लोकसभा उमेदवार 22 एप्रिल रोजी दाखल करणार अर्ज

Loksabha Election : लोकसभेचे जळगाव आणि रावेरमधील भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार हे येत्या 22 एप्रिल रोजी दुपारी एक ते तीन वाजेदरम्यान अर्ज दाखल करणार आहेत. भाजप-शिवसेना महायुतीचे सर्व आमदार तसेच जिल्हाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता.10) रात्री उशिरा पार पडली. त्यात भाजपच्या दोन्ही लोकसभा उमेदवारांचे अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शनात दाखल करण्याविषयी विचारविनिमय झाला.

भारतीय जनता पार्टीच्या नूतन जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीच्या ठिकाणी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजपच्या लोकसभा उमेदवार स्मिता वाघ आणि रक्षा खडसे, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर व अमोल जावळे, महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच सरिता माळी, कुंदन काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

16 एप्रिल रोजी जळगाव शहरात महायुतीच्या मेळाव्याचे होणार आयोजन

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांचा पहिला भव्य मेळावा येत्या 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच ते सात वाजेदरम्यान जळगाव शहरातील आदित्य लॉन्सवर सदरचा मेळावा घेतला जाणार आहे. त्याबाबतीत देखील जळगावात पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button