जळगावच्या जागेचा सस्पेन्स कायम ठेवून शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर
Loksabha Election : काँग्रेसने काही जागांवर दावा करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मंगळवारी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होऊ दिली नव्हती. अखेर आज बुधवारी (ता.27) सेनेकडून जळगावच्या जागेचा सस्पेन्स कायम ठेवून राज्यातील अन्य 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट देखील केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी, याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी याबद्दल विचारविनियम करून राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचे नियोजन सुद्धा या बैठकीत झाल्याचे समजते.
शिवसेना ठाकरे गटाकडून यांना मिळाली आहे लोकसभा उमेदवारीची संधी
● बुलढाणा- प्रा. नरेंद्र खेडेकर
● यवतमाळ/ वाशिम- संजय देशमुख
● मावळ- संजोग वाघेरे पाटील
● सांगली- चंद्रहार पाटील
● हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
● संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
● धारशीव- ओमराजे निंबाळकर
● शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
● नाशिक- राजाभाऊ वाजे
● रायगड- अनंत गीते
● सिंधुदुर्ग/ रत्नागिरी- विनायक राऊत
● ठाणे- राजन विचारे
● मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील
● मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
● मुंबई वायव्य- अमोल कीर्तिकर
● परभणी- संजय जाधव
● मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई