भारतीय जनता पार्टी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकसभा उमेदवारांचे तिकीट कापणार

कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचा पहिला नंबर

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी मतदारांसमोर बोलताना वादग्रस्त वक्तव्ये करू नये, अशी ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. प्रत्यक्षात त्यानंतरही काही उमेदवार हे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळाल्याने भाजपाने कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट रद्द केले आहे. एनडीएला 400 जागा मिळाल्यावर राज्यघटना बदलली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य हेगडे यांनी नुकतेच केले होते.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाचवेळा उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या असून, पक्षाने यंदा खूप मोठा फेरबदल घडवून आणला आहे. भाजपाकडून अनेक खासदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षातील खासदारांच्या बैठकीत देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात जनजागृती करण्यासोबतच कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. पक्षाला अडचणीत आणणारे कोणतेही वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीदच त्यांनी खासदारांना दिली होती. प्रत्यक्षात त्यानंतरही तोंडात येईल ते लोकांसमोर बोलणाऱ्यांची शाळा भरविण्यास भाजपाने आता सुरूवात केली आहे.

सहा पंचवार्षिक खासदार राहिलेले अनंतकुमार हेगडे यांनाही सोडले नाही
अनंतकुमार हेगडे 2004 ते 2019 पर्यंत सतत विजयी झाले असून, ते कर्नाटकातील उत्तरा कन्नडमधून सहा पंचवार्षिक भाजपचे खासदार राहिले आहेत. त्यानंतरही भाजपाने त्यांना सहज सोडलेले नाही. “संविधानात सुधारणा करावी लागेल कारण काँग्रेसच्या लोकांनी काही अनावश्यक बदल करून त्यात मूलभूत बदल केले आहेत. विशेषतः हिंदू समाजाशी संबंधित कायदे हे सर्व बदलायचे असेल तर ते दोन तृतीयांश बहुमताशिवाय शक्य नाही. एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास हा बदल होऊ शकतो,” असे वादग्रस्त वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button