लग्नात आहेर नाही आणला तरी चालेल, तुमचे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना द्या…!

नवरदेवाच्या बापाने लग्न पत्रिकेतून दिला संदेश
Loksabha Election : हल्ली लग्न समारंभांच्या निमंत्रण पत्रिकांवर ‘कोणताही आहेर स्वीकारला जाणार नाही तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर आहे,’ अशी तळटीप आवर्जून लिहिलेली दिसते. हैदराबादमधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका नवरदेवाच्या बापानेही मुलाच्या लग्न पत्रिकेवर तशी तळटीप लिहिली आहे. मात्र, त्याद्वारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नरेंद्र मोदींचा फोटो असलेली सदरची लग्न पत्रिका सगळीकडे चांगलीच व्हायरल झाली आहे.

रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी नानिकांती नरसिम्हालू हे भारतीय जनता पार्टीचे मोठे समर्थक आहेत. सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मुलाचे लग्नकार्य जमल्याने नानिकांती यांची सध्या मोठी धावपळ होत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकार्यात प्रत्यक्ष भाग घेता येत नसताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पर्यायाने आपल्या पक्षाला मत देण्याचे आवाहन करणारी नामी युक्ती त्यांनी शोधून काढली आहे. 04 एप्रिलला होत असलेल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण आपल्या नातेवाईकांसह मित्र मंडळी व परिसरातील नागिरकांना पाठविताना त्यांनी “नवविवाहित जोडप्यासाठी भेटवस्तू आणू नका, पण आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करा,”असा हटके संदेश दिला आहे. सदरची लग्न पत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. लग्नाला येताना आहेर नको, फक्त पंतप्रधान मोदींना मतदान करा. जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिले तर ती आमच्या लग्नाची सगळ्यात महाग भेटवस्तू ठरेल, असेही त्यांनी निमंत्रण पत्रिकेत नमूद केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button