जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सुमारे 38 लाख मतदारांची नोंद…

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर
Loksabha Election : जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात आजअखेर सुमारे 37 लाख 93 हजार 423 मतदारांची नोंद घेण्यात आली आहे. पैकी जळगाव लोकसभा मतदारसंघात 19 लाख 81 हजार 472 तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 11 हजार 951 एवढे मतदार आहेत. दोन्ही मतदार संघातील पुरुष मतदारांची संख्या 19 लाख 68 हजार 114 आणि स्त्री मतदारांची संख्या 18 लाख 25 हजार 172 तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 137 इतकी आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव लोकसभा मतदारसंघात आजअखेर 19 लाख 81 हजार 472 आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 11 हजार 951 एवढी मतदार नोंदणी झाली आहे. पैकी जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण पुरुष मतदारांची संख्या 10 लाख 31 हजार 60 एवढी असून, स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे. तर तृतीयपंथी मतदार एकूण 83 आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय मतदारांची संख्या :
जळगांव शहर
पुरुष- 207019, स्त्री-188113, तृतीयपंथी 32, एकुण 3,95,164 मतदार.
जळगांव ग्रामीण
पुरुष- 1,66330, स्त्री- 1,55302, तृतीयपंथी -03, एकुण 3,21,635 मतदार.
अमळनेर
पुरुष-155220, स्त्री-146010, तृतीयपंथी- 3, एकुण 3,01,233 मतदार.
एरंडोल
पुरुष- 147479, स्त्री- 138322, तृतीयपंथी- 10, एकुण 2,85,811 मतदार.
चाळीसगांव
पुरुष- 189801, स्त्री- 169851, तृतीयपंथी- 29, एकुण 3,59,681 मतदार.
पाचोरा
पुरुष- 165211, स्त्री- 152731, तृतीयपंथी- 6, एकुण 3,17,948 मतदार.

रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून, महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे. तर तृतीयपंथी मतदार एकूण 54 आहेत, अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आजअखेर झाली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय मतदारांची संख्या :
चोपडा
पुरुष- 164152, स्त्री- 156584, तृतीयपंथी- 02, एकुण 3,20,738 मतदार.
रावेर
पुरुष-153883, स्त्री- 144447, तृतीयपंथी- 02, एकुण 2,98,332 मतदार.
भुसावळ
पुरुष-154058, स्त्री-143539, तृतीयपंथी- 37, एकुण 2,97,634 मतदार.
जामनेर
पुरुष- 166837, स्त्री- 154519, तृतीयपंथी-00, एकुण 3,21,356 मतदार.
मुक्ताईनगर
पुरुष-151628, स्त्री- 142683, तृतीयपंथी-07, एकुण 2,94,318 मतदार.
मलकापुर
पुरुष-146496, स्त्री- 133071, तृतीयपंथी- 6, एकुण 2,79,573 मतदार.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button