जाणून घ्या, धुळे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत किती झाले मतदान ?
जळगाव टुडे । राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवारी (ता.20) सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार सर्वात कमी 41.70 टक्के मतदान हे कल्याण मतदारसंघात झाले आहे. तर सर्वाधिक 57.06 टक्के मतदान हे दिंडोरी मतदारसंघात झाले आहे. दरम्यान, बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेनंतरही सुरूच आहे. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी मिळण्यास बराच उशीर होणार आहे. (Loksabha Election)
मतदारसंघनिहाय टक्केवारी (पाच वाजेपर्यंत)
■ धुळे- 48.81 टक्के
■ नाशिक – 51.16 टक्के
■ दिंडोरी- 57.06 टक्के
■ भिवंडी- 48.89 टक्के
■ कल्याण – 41.70 टक्के
■ मुंबई उत्तर – 46.91 टक्के
■ मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के
■ मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के
■ मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के
■ मुंबई दक्षिण – 44.22 टक्के
■ मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
■ पालघर- 54.32 टक्के
■ ठाणे – 45.38 टक्के