जळगाव तालुक्यात दोन माजी सरपंचांना दाखविले मयत; मतदानापासून वंचित !

जळगाव टुडे । लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात आज सोमवारी होत असलेल्या मतदानाच्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच जणांना मतदार यादीत मयत असल्याचे दाखवण्यात आल्याने मतदानापासून वंचित देखील राहावे लागले आहे. तर नव मतदारांना नाव नोंदवून सुद्धा मतदान करता आलेले नाही. जळगाव तालुक्यातील वडली येथील दोन माजी सरपंचांना तर चक्क मयत दाखविण्याची कमाल निवडणूक यंत्रणेने केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ( Loksabha Election)

वडली गावातील मतदार यादीत गोकुळ गजमल पाटील व सत्यभामा अशोक पाटील या माजी सरपंचांसह त्र्यंबक श्यामराव पाटील व जितेंद्र एकनाथ पाटील या चार जीवंत व्यक्तींना मयत दाखविण्यात आले आहे. त्याशिवाय खरोखर मयत झालेल्यांची नावे मात्र मतदार यादीत कायम होती. धक्कादायक प्रकार म्हणजे नाव नोंदणी करुनही अनेक नव मतदारांची नावेच मतदार यादीत समाविष्ट झालेली नव्हती. त्यामुळे बऱ्याच नव मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. बीलएओंनी नवीन मतदारांची नोंदणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. दुसऱ्याही बऱ्याच गावांमध्ये निवडणूक यंत्रणेने सावळा गोंधळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button