लोकसभेसाठी भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Loksabha Election : भाजपची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 02) जाहीर झाली. या यादीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि शिवराज सिंह आदींचा देखील समावेश आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून निवडणूक लढविणार आहेत. तर अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढणार आहेत.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, दिल्लीचे 5, जम्मू-काश्मीरमधील 2, उत्तराखंडमधील 3, अरुणाचल 2, गोव्यातील 1, त्रिपुरा 1, अंदमान 1, दमण आणि दीवमधील 1 जागेचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. यामध्ये 28 महिला, 47 तरुण, 27 एससी, 18 एसटी आणि 57 ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. पीएम मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशातील गुना आणि शिवराज सिंह यांना विदिशामधून तिकीट देण्यात आले आहे.