lalbaugcha raja : नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या चरणी यंदाही भाविकांकडून ‘इतक्या’ कोटी रूपयांचे दान…!
lalbaugcha raja : नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या चरणी यंदाही भाविकांनी मनोभावे कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यभरातून आणि देशभरातून हजारो भाविक दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. या वर्षीही गणेशोत्सवात भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
lalbaugcha raja: At the feet of the king of Lalbaug taking vows, this year too ‘so many’ crores of rupees were donated by devotees…!
लालबागच्या राजाच्या या श्रद्धापूर्ण उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांची आस्था आणि श्रद्धा दिसून आली आहे. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पैसे, सोने, चांदीचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू बाप्पाच्या चरणी अर्पण केल्या. काही भाविकांनी गुप्त दान तर काहींनी दानपेटीतून रक्कम अर्पण केली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आलेल्या मोजदात नुसार, यंदाही कोट्यवधी रुपयांचे दान संकलित झाले आहे. या दानातून मिळणारी रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी आणि जनसेवेसाठी वापरण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राजाच्या चरणी ५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम
नवसाला पावणारा लालबागचा राजा भाविकांच्या अपार श्रद्धेचे प्रतीक असून, यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे. लालबागच्या राजावर असणारी भक्ती आणि प्रेम अनन्य साधारण आहे. “बाप्पा देतो तर भरपूर देतो,” अशी भावना भाविकांच्या मनात असल्याने दरवर्षी लालबागच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी ५ कोटी ६५ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम दान स्वरूपात अर्पण केली आहे, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिली. १० दिवसांच्या उत्सवात भाविकांनी सोने, चांदी, दागिने आणि मौल्यवान वस्तूंचेही भरभरून दान केले आहे. मंडळाने दानाची मोजदात पूर्ण केल्यानंतर सदरची आकडेवारी जाहीर केली.