ladaki Bahin Yojana : खुशखबर…महिलांना लाडकी बहीण योजनेतून नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता ॲडव्हान्समध्ये मिळणार…!

ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा हफ्ता दिला जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये लाभार्थी महिलांना 10 ऑक्टोबरपर्यंत दिले जाणार आहेत. या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांनी अर्ज सादर केलेले असल्यास त्यांना हक्काचे पैसे वेळेत मिळतील, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.

ladaki Bahin Yojana: Women will get the week of November in advance from Ladki Bahin Yojana…!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत तीन हफ्ते दिले आहेत. पहिला हफ्ता दोन महिन्यांचा एकत्रितपणे दिला गेला होता, आणि आता पुन्हा एकदा महिलांना दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत.

सरकारच्या नवीन निर्णयानुसार, दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीच्या आधीच हा बोनस मिळणार असल्याने महिलांना सणासुदीच्या काळात मोठी आर्थिक मदत होणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे आणि योजनेत सहभागी झालेल्या महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार मिळत आहे, असाही दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button