ladaki Bahin Yojana : मोठी बातमी; लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत आता जुलै, ऑगस्ट महिन्याचे कोणतेच पैसे…!
ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती आणि मुदतीत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै-ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात अनेक महिलांना मुदतीत नोंदणी करूनही अद्याप कोणतीच रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, ०१ सप्टेंबरनंतर लाडकी बहीणसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील जुलै-ऑगस्ट महिन्याचे कोणतेच पैसे मिळणार नाहीत, असे सरकारने आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
Ladaki Bahin Yojana : Big News; Dear sisters will not get any money for the month of July, August now…!
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना राज्यातील महिलांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे. राज्यभरातील लाखो महिलांचा या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे आणि अजूनही अनेक महिला या योजनेसाठी नोंदणी करत आहेत. दरम्यान, ३१ ऑगस्टपर्यंत योजनेच्या लाभासाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित ३ हजार रूपयांचा लाभ देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार मुदतीत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन सणाच्या दोन दिवस आधीच ओवाळणी म्हणून ३ हजार रूपये जमा करण्याची घोषणाही करण्यात आली होती. प्रत्यक्षात अनेक महिलांना रक्षाबंधन सणानंतरही कोणतीच ओवळणी मिळालेली नाही.
यापुढे ज्या महिन्यात नोंदणी केली असेल, त्या महिन्यापासूनच मिळेल लाभ
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात योजनेच्या नोंदणी प्रक्रियेबाबत बोलताना सांगितले की, एक सप्टेंबर २०२४ पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ मिळणार नाहीत. म्हणजेच महिलांनी ज्या महिन्यात नोंदणी केली असेल, त्या महिन्यापासूनच त्यांना योजनेचे लाभ मिळतील. यामुळे जर एखाद्या महिलेला सप्टेंबर महिन्यात नोंदणी केली असेल, तर तिला सप्टेंबर महिन्यापासूनच योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख नसून, नोंदणी प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी नोंदणी लवकरात लवकर करण्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. कारण नोंदणीच्या महिन्यापासूनच त्यांना लाभ मिळणार आहे.