‘नारीशक्ती दूत’ ॲपवर उद्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार !

जळगाव टुडे । ‘नारीशक्ती दूत’ ॲपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उद्या गुरूवार (ता.०४) पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. ( Ladaki Bahin Yojana )

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेत मोठी सुधारणा केली असून, नवीन बदलानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलेची वयोमर्यादा आता २१ ते ६५ करण्यात आली असून, रहिवास प्रमाणपत्राची अट देखील शिथील झाली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये या आधी आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले तरी त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button