Ladaki Bahin Yojana : ३२०० कोटींच्या ओवाळणीचा दावा; बऱ्याच लाडक्या बहिणींना अद्याप एक कवडीही मिळालेली नाही !
Ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेतून एक कोटी महिलांच्या बँक खात्यात सुमारे ३२०० कोटी रूपयांची ओवाळणी जमा केल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. प्रत्यक्षात बऱ्याच लाडक्या बहिणींना अद्याप एक कवडीही मिळालेली नसून, रक्षाबंधन उद्यावर आले तरी त्या ओवाळणीपासून वंचितच राहिल्या आहेत. आपल्याला पैसे मिळतील की नाही, याची चिंता त्या महिलांना आता सतावत आहे.
Ladaki Bahin Yojana : Waving claim of Rs.3200 crore; Many beloved sisters have not received even a single skull yet!
महाराष्ट्र सरकारकडून महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने लाडकी बहीण योजनेतून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक महिलेच्या खात्यावर ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी १४ ऑगस्टपासून सुरू झाली असून, अवघ्या चार दिवसांतच तब्बल 3,200 कोटी रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या योजनेच्या औपचारिक शुभारंभाचा भव्य सोहळा शनिवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात एकूण सुमारे ९ कोटी २० लाख मतदार आहेत. त्यापैकी ४ कोटी ४१ लाख महिला मतदार आहेत. या एकूण महिलांपैकी सुमारे २५ टक्के महिलांना राखी पौर्णिमेपूर्वी पैसे देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एकूण २ कोटी म्हणजे ४५ टक्के महिलांना लाभार्थी बनवून त्यांची मते पदरात पाडून घेण्याचा खटाटोप महायुतीचे सरकार करत आहे.
अनेक महिलांना बँकेत पैसे जमा झाल्याचाही मॅसेज नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुन्हा निवडून आल्यानंतर पाच वर्षात प्रत्येकी ९० हजार रूपये देऊ, असे नवीन आश्वासन महिला मतदारांना दिले आहे. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात जेवढ्याही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, त्यांच्यापैकी बऱ्याच महिलांना अजुनही बँकेच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा कोणताच मॅसेज आलेला नाही. काही महिलांना तर अर्ज भरून बरेच दिवस झाले तरी देखील अर्ज ॲप्रुव्ह झाल्याचा साधा मॅसेज आलेला नाही. रक्षाबंधन उद्यावर आले असताना, संबंधित सर्व महिलांच्या जीवाची घालमेल त्यामुळे वाढलेली आहे. बँकेत जमा झालेले पैसे लगेच न काढल्यास परत घेतले जातील, या भीतीने अनेक महिला बँकांमध्ये जाऊन आपल्या खात्यावरील जमा रकमेची खात्री करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभ्या राहताना दिसत आहेत.