ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ‘या’ महिलांना सध्या मिळणार नाहीत १५०० रूपये !

ladaki Bahin Yojana : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने महिलांना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या आधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यात तीन हजार रूपये टाकणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात अर्ज भरणाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के महिलांना लाडकी बहीण योजनेतून सध्यातरी कोणताच लाभ मिळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ladaki Bahin Yojana: These women will not get 1500 rupees from Ladaki Bahin Yojana!

राज्यातील सुमारे १ कोटी ४० लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर दरमहा तब्बल २१०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यासाठी आयोजित मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले, की आतापर्यंत १ कोटी ३५ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. परंतु, त्यातील ३५ लाख महिलांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही. त्यामुळे त्यांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत. या सर्व महिलांना आणि ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या इतर महिलांनाही सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचे पैसे देऊ आणि ऑक्टोबर महिन्यातही सर्वांच्या खात्यात पैसे जमा करू, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. हे पैसे महिलांना दिल्यानंतर कोणीही परत घेऊ शकणार नाही. पण ही योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या चिन्हांवर मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. अर्थात ही आपली विनंती आहे सक्ती नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी केले. एकूण चित्र लक्षात घेता महिलांना पैसे दिल्यानंतर ते परत घेतले जाणार असल्याच्या चर्चेने महायुती चांगलीच धास्तावली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button