Ladaka Bhau Yojana : मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी ‘या’ आहेत अटी; चेक करा तुम्ही त्यात बसता का ?

Ladaka Bhau Yojana : महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर शासनाने आता विद्यार्थ्यांसाठीही लाडका भाऊ योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामाध्यमातून १२ वी पास विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना ८ हजार आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. मात्र, लाडका भाऊ योजनेच्या लाभासाठी काही अटी आहेत. त्यात बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतनाचा लाभ मिळू शकणार आहे.

Ladaka Bhau Yojana : These are the conditions for the Chief Minister Ladaka Bhau Yojana; Do you fit in?
प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्याचे वय किमान १८ आणि जास्तीत जास्त ३५ असले पाहिजे. त्यासोबतच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याची आधार नोंदणी झालेली पाहिजे. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म दाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक, ही कागदपत्रे प्रामुख्याने लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशा आहेत लाडका भाऊ योजनेच्या अटी
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय १८ आणि कमाल ३५ वर्षे असावे. विशेष म्हणजे संबंधित विद्यार्थ्याची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवी/ पदव्युत्तर असावी. अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. विद्यार्थ्याची आधार नोंदणी झालेली असावी. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न असावे. तसेच त्याने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button