Ladaka Bhau Yojana : शासन १२ वी पास विद्यार्थ्यांना देणार दरमहा ६ हजार रूपये विद्यावेतन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ladaka Bhau Yojana : महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर शासनाने आता विद्यार्थ्यासाठीही लाडका भाऊ योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामाध्यमातून १२ वी विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना ८ हजार आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रूपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याविषयीची अधिकृत घोषणा आजच पंढरपुरात केली.

Ladaka Bhau Yojana : Government will give 12th pass students six thousand per month; Chief Minister’s announcement
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटनही केले. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजनेची देखील घोषणा केली.

लाडका भाऊ योजना अंतर्गत १२ वी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला ८ हजार रुपये आणि डिग्रीच्या तरुणाला १० हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत. हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघेल, असाही विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button