भारतीय तटरक्षक दलात ३२० रिक्त जागांची भरती; १२ वी-डिप्लोमा उत्तीर्णांना संधी…!
जळगाव टुडे । भारतीय तटरक्षक दल म्हणजेच Indian Coast Guard मध्ये नाविक आणि यांत्रिक पदाच्या ३२० रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. १२ वी उत्तीर्ण तसेच इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार संबंधित पोस्टसाठी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्यास विसरू नका. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२४ आहे. ( Job Opportunity )
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. अर्ज भरताना सर्वसाधारण तसेच ओबीसींना ३०० रूपये फी लागेल. एससी व एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. ०१ मार्च २००३ ते २८ फेब्रुवारी २००७ च्या दरम्यान जन्म झालेले उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात ०५ वर्षांची तर ओबीसींना वयात ०३ वर्षांची सूट मिळेल.
शैक्षणिक पात्रता:
● नाविक (GD) 01/2025 बॅच : 12वी उत्तीर्ण (Maths & Physics).
● यांत्रिक (GD) 01/2025 बॅच : 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering).
अधिकृत वेबसाईट-पाहा
जाहिरात-पाहा
ऑनलाईन अर्जाची लिंक-येथे क्लीक करा