तरूणांना पोलिस भरतीची सुवर्णसंधी, राज्य शासन 16,324 जागा भरणार

Job Opportunity : पोलिस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील तरूण व तरूणींसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य शासन लवकरच सुमारे 16,324 रिक्त जागांची भरती करणार असून, इच्छुकांना मंगळवार (ता. 05) पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासंदर्भात सूचनापत्र देखील जाहीर झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य राखीव दलाच्या 4,124 तसेच पोलिस शिपाई पदाच्या सुमारे 10,300 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने 05 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहेत. शासनाकडून काही महिन्यांपूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पोलिसांच्या 75 हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पेपर पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी तसेच इतर शासकीय परीक्षांमधील प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या तक्रारी येऊ नये यासाठी पोलिस विभागाने यावेळी विशेष काळजी घेतली आहे. त्याकरीता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलिस भरतीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीत मैदानी चाचणीत 50 टक्के गुण तसेच लेखी चाचणीत 40 टक्के गुण आवश्यक असणार आहेत. दरम्यान, कोविड काळात झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली होती. ती कायम ठेवण्यात येऊन पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांना यावेळीही संधी द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी आता सुद्धा केली जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button