Jalgaon Politics : गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीची उमेदवारीच मिळू नये, यासाठी ‘देव’ पाण्यात ठेवले होते काहींनी !

राजकीय विरोधकांना बसला मोठा धक्का

Jalgaon Politics : लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजत नाही तेवढ्यातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावमध्ये दणदणीत जिल्हा मेळावा घेऊन टाकला आहे. साहजिक त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने सर्वात प्रथम जळगाव ग्रामीणसाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी निश्चित करून राजकीय विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. कारण, देवकरांना राष्ट्रवादीची उमेदवारीच मिळू नये, यासाठी काहींनी त्यांचे देव पाण्यात ठेवल्याचे सांगितले जात होते.

Jalgaon Politics : Some people put ‘God’ in water so that Gulabrao Deokar does not get NCP nomination!
विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ गेल्या दोन पंचवार्षिकपासून शिवसेनेच्या ताब्यात असला तरी त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव थोडाही कमी झालेला नाही. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विचारांशी जुळलेली नाळ तुटू दिलेली नाही. याचाच मोठा धसका घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाने विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे वेध लागताच राष्ट्रवादीच्या काही लोकांना फोडण्यासाठी अलिकडे हालचाली देखील गतीमान केल्या होत्या. मात्र, काही करूनही राष्ट्रवादीचे निष्ठांवत कार्यकर्ते जाळ्यात अडकत नसल्याने त्यांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले होते.

राष्ट्रवादीची विरोधकांना मोठी चपराक
दरम्यान, निष्ठावानांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीकडून माजी मंत्री गुलाबराव देवकरांना यंदा उमेदवारी मिळणार नाही, अशी अफवा विरोधकांकडून अलिकडे पसरविण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गट जळगाव ग्रामीण मतदारसंघार दावा दाखल करू शकतो,अशीही चर्चा विरोधकांनी घडवून आणली होती. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात आधी गुलाबराव देवकरांची जळगाव ग्रामीणसाठी उमेदवारी निश्चित करून विरोधकांना मोठी चपराक दिली आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना, अर्थातच महाविकास आघाडीने दिलेला जोरदार धक्का पचविणे शिंदेसेनेला खूप जड जात आहे. वैफल्यातून माजी मंत्री देवकरांना लक्ष्य करून बिनबुडाचे आरोप करण्याचे प्रकारही त्यामुळे शिंदेसेनेकडून सुरू झाल्याचे दिसून आले आहे.

पक्षाने गुलाबराव देवकरांचा राखला सन्मान
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीची उमेदवारीच मिळू नये, यासाठी विरोधक देव पाण्यात ठेवून बसलेले होते. मात्र, माजी मंत्री श्री.देवकर हे कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता जळगाव ग्रामीणमधील एकेक गाव पिंजून काढत होते. शेतांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. अपेक्षेनुसार त्यांना पहिल्या फळीतील मातब्बर उमेदवारांच्या यादीत स्थान देऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा सन्मान कायम राखला आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील उत्साह त्यामुळे आणखी द्विगुणीत झाल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button