Jalgaon News : जळगाव शहरात भरधाव ट्रकच्या धडकेत दोन महिला जागीच ठार…!

Jalgaon News : शहरातील मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंप दरम्यान आज बुधवारी, (ता.२८ ऑगस्ट) रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवर दोन महिला आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा प्रवास करत होते. भरधाव ट्रक अचानक दुचाकीला धडकला, ज्यामुळे दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) आणि दीक्षिता राहूल पाटील (वय २७ दोन्ही रा. द्वारकाई अपार्टमेंट, जळगाव) असे मृतांची नावे आहेत. 

Jalgaon News: Two women died on the spot after being hit by a speeding truck in Jalgaon city

या भीषण अपघातात लहान मुलालाही गंभीर इजा झाली असून, त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाची स्थिती चिंताजनक असली तरी सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी ट्रकचालकाच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

शहरातील खोटेनगरकडून मानराज पार्ककडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकी (एमएच १८ एएस ५३७९) वरून दोन महिला आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा प्रवास करत असताना, अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेल्या एका वर्षाच्या चिमुकल्यालाही गंभीर इजा झाली असून त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच आक्रोश केला.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button