जळगाव जिल्ह्यात निराधार योजनेच्या लाभार्थींसाठी ‘इतक्या’ कोटींचे अनुदान मंजूर…!

बँकेत लवकरच जमा होणार लाभाची रक्कम

जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या सुमारे ७६ हजार ८२८ लाभार्थींसाठी राज्य शासनाने तब्बल २५ कोटी ५३ लाख २३ हजार ५०० रूपये रक्कम मंजूर केली आहे. सदरची अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आली असून, ती लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारण आठ दिवसात लाभार्थींना निराधार योजनेचे अनुदान मिळू शकेल, अशी माहिती मिळाली आहे. ( Jalgaon News )

Jalgaon News
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची २५ कोटी ५३ लाख रूपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. जिल्हा प्रशासनाने अनुदानाची रक्कम प्राप्त होताच ती संबंधित लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने तातडीने पाऊले उचलली आहेत. तरीही साधारणपणे एक आठवडा या कार्यवाहीसाठी लागू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी संख्या (कंसात अनुदान)
● जळगाव शहर- ६,१२९ (१,८१,२३,०००)
● जळगाव ग्रामीण- ४,३२९ (१,२७,६८,०००)
● जामनेर- ६१,५७ (१,७८,३६,२००)
● एरंडोल- ३,५५० (८१,६३,०००)
● धरणगाव- ४,१३६ (२,३२,२७,६००)
● भुसावळ शहर- २८०० (८७,०७,४००)
● भुसावळ ग्रामीण- ३२०० (९७,१७,०००)
● यावल- ५,२३० (१,५६,९०,०००)
● रावेर- ४,७६८ (१,३७,५६,२००)
● मुक्ताईनगर- ४,०९७ (१,२८,१६,६००)
● बोदवड- २,३६९ (६७,७५,८००)
● पाचोरा- ६,१६७ (२,१४,८६,०००)
● भडगाव- ४,११२ (१,२३,३०,०००)
● चाळीसगाव- ६,४८० (१,८२,५९,४००)
● अमळनेर- ६,०६२ (१,७३,९४,०००)
● पारोळा- २,८२८ (९३,७३,१००)
● चोपडा- ४,३५३ (१,२७,२३,०००)

WhatsApp Group

Related Articles

Back to top button