Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात उद्या आणि परवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिव स्वराज्य’ यात्रा…!

चार ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील महायुतीच्या सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा जळगाव जिल्ह्यात शनिवारी (ता.२१) आणि रविवारी (ता.२२) थांबणार असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहेत.

Jalgaon News : Sharad Chandra Pawar NCP’s ‘Shiv swarajya’ Yatra tomorrow and the day after tomorrow in Jalgaon district…!

महायुतीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीला जाण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते मात्र हातावर हात धरून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी ‘शिव स्वराज्य’ यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातही दोन दिवस राष्ट्रवादीची शिव स्वराज्य यात्रा येत आहे. यानिमित्त चाळीसगाव तसेच जामनेर, बोदवड, चोपडा शहरात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘असे’ आहे जळगाव जिल्ह्यातील शिव स्वराज्य यात्रेचे नियोजन

शनिवार (ता.२१) : चाळीसगाव येथे विराम लॉन्सवर सकाळी ११ वाजता जाहीर सभा, जामनेर येथे दुपारी ४.३० वाजता बोहरा मंगल कार्यालयात सभा, बोदवड येथे रात्री ७.०० वाजता गांधी चौकात जाहीर सभा.
शनिवार (ता.२२) : चोपडा येथे जिनिंग मिलमध्ये सकाळी ११.०० वाजता जाहीर सभा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button