jalgaon News : जळगावमध्ये महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली दहीहंडी…!

jalgaon News : महायुतीच्या काळातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना, सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी तसेच शेतकऱ्यांवरील अन्याय, याकडे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवारी (ता.२७) जळगावात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. प्रसंगी महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचे फुगे फोडत प्रतिकात्मक दहीहंडी सुद्धा फोडली.

Jalgaon News : Sharad Chandra Pawar Nationalist Congress broke the Dahihandi about the black exploits of the Mahayuti in Jalgaon…!

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर महायुतीचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या काळातील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारीवर देखील निशाणा साधला. जळगाव शहर कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनीही महायुतीच्या भोंगळ कारभारावर टीका केली.

दहीहंडी कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती

महायुतीच्या काळ्या कारनाम्यांचा निषेध नोंदविण्यासाठी आयोजित केलेला आंदोलनाच्या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक शहराध्यक्ष रिकू चौधरी, कार्याध्यक्ष संग्राहसिंह सुर्यवंशी व ॲड.सचिन पाटील, महिला आघाडीच्या मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, कल्पिता पाटील, अशोक लाडवंजारी, नामदेव चौधरी, रमेश पाटील, चंदू चौधरी, सुनील माळी, संजय चव्हाण, सामाजिक न्यायचे अशोक सोनवणे, रमेश बहारे, पंकज तनपुरे आदी उपस्थित होते.

WhatsApp Group

जितेंद्र पाटील (मुख्य संपादक)

गेल्या 24 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सकाळ-ॲग्रोवनमध्ये खान्देशातील बातमीदारीचा मोठा अनुभव. लोकसत्ता तसेच लोकमत, दिव्य मराठी वृत्तपत्रातही विपुल लिखाण केले आहे. प्रिंट मीडियासह यूट्युब, फेसबुक आणि आता वेब पोर्टलवर सर्व सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील. शेतीविषयी लिखाणात हातखंडा राहिला आहे. सन 2012 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित.

Related Articles

Back to top button