Jalgaon News : शिंदेसेनेत अस्वस्थता; पाचोऱ्यातील निर्धार मेळाव्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ…!

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेकडून एकत्र निवडणूक लढण्याचा दावा केला जात असला तरी, जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षात आलबेल स्थिती नसल्याचा प्रत्यय हळूहळू येऊ लागला आहे. पाचोरा शहरात शिंदेसेनेने आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याकडे तर भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्याबद्दल शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Jalgaon News : Restlessness in Shindesena; BJP officials turned their backs on the meeting in Pachora…!

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरात आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याला भाजपच्या वतीने एकही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. यामुळे जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मेळाव्यातूनच भाजपवर खरमरीत टीका केली. या मेळाव्यासाठी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि जिल्ह्यातील इतर आमदार-खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, सर्वांनीच या मेळाव्याला अनुपस्थित राहून शिवसेनेला धक्का दिला. त्यामुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी थेट मेळाव्यातून भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, यामागे शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद हे प्रमुख कारण आहे. तर काही जणांचे म्हणणे आहे की, भाजप आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आपली रणनीती आखत आहे आणि याचे पडसाद विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातही पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

लोकसभा निवडणुकीत एकत्र राहिल्यामुळे विपरीत परिस्थितीत देखील महायुतीला जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर विजय मिळवणे शक्य झाले होते. “लोकसभा निवडणुकीत आपण एकसंघ होतो म्हणून दोन्ही जागा निवडून आल्या. त्याचप्रमाणे विधानसभेतही जर आपण एकसंघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील ११ पैकी ११ जागा जिंकता येऊ शकतात,” अशी आशा शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी महायुतीतील फुटीच्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त करताना असेही म्हटले की, “महायुतीत फूट फडणे हे विधानसभा निवडणुकीत नुकसानीचे ठरेल. पुढील काळात ही फूट दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे देखील ते म्हणाले. युतीतील या मतभेदांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपण गाऱ्हाणे मांडणार असल्याचे देखील शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button