Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात भेसळयुक्त दुधाचा सर्रास पुरवठा…!

माजी खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप

Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात युरिया तसेच तेल मिसळलेल्या भेसळयुक्त दुधाचा सर्रास पुरवठा होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असा गंभीर आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला आहे. दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या गुरुवारी (ता.०५) आयोजित केली आहे. त्यापार्श्वभूमीवर माजी खासदारांनी दूध संघाच्या संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणून मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Jalgaon News : Rampant supply of adulterated milk in Jalgaon District Cooperative Milk Producers Union…!

जळगाव दूध संघातील अनागोंदी कारभार व अनियमिततेची माहिती देण्यासाठी पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर थेट टीका केली. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व हर्षल माने, सुनील महाजन, शरद तायडे आदी उपस्थित होते.

माजी खासदारांनी जळगाव दूध संघाच्या संचालक मंडळाला विचारलेले प्रश्न

■ पहिल्या टप्प्याचे गाय दूध अनुदान संपून आता ६ महिने झाले आहे तसेच दुसऱ्या टप्प्याचे अनुदान सुरू होऊन ६५ दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान का मिळालेले नाही ?
■ दूध संघाच्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हयातून प्रथम येणाऱ्या संस्थेला तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त करु, असे ठरले होते. त्याची प्रोसिडींगमध्ये नोंद का घेतली नाही ?
■ नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्पादकांनी पुरवठा केलेल्या गायीच्या दुधाला फक्त २७/- रूपये प्रति लिटरचा खरेदी दर दिला. दुसरीकडे अतिरिक्त दूधाची लोणी व भुकटी तयार करून त्याची ज्यादा दराने विक्री केली. या मार्गाने नफा कमावण्याचा उद्देश काय ?
■ जळगाव दूध संघाच्या कारखान्यातील पशुखाद्याची विक्री दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून आले आहे. पशुखाद्याची गुणवत्ता ढासळली आहे का ?
■ जळगाव जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध असताना, पुसदच्या अमृतधारा डेअरीकडून दूध खरेदी करण्याचे काय कारण आहे ?
■ जळगाव दूध संघाकडून खाजगी बीएमसीला रू. ३.७०/- अतिरिक्त दर दिला जातो, जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांना मात्र ०.४७/- पैसे प्रति लिटर इतकाच दर का दिला जातो ?
■ जळगाव दूध संघाचे दैनंदिन दूध संकलन वाढले आहे, मात्र संस्था कमी का झाल्या आहेत ?
■ दुधाची विक्री मागील १० वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात कमी होण्याचे कारण काय आहे ?

WhatsApp Group

Related Articles

Back to top button