Jalgaon News : ममुराबादची पीक संरक्षण सहकारी संस्था ग्रामस्थांच्या सोयीसाठी ‘स्वर्गरथ’ तयार करणार…!

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील पीक संरक्षण सहकारी संस्था ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवकरच ट्रॅक्टरचलित स्वर्गरथ तयार करणार आहे. त्यासंदर्भात ठरावावर संस्थेच्या वार्षिक सभेत नुकतीच चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी बहुसंख्य संचालकांनी स्वर्गरथात्या ठरावाला एकमताने मंजुरी देखील दिली.

Jalgaon News : Mamurabad’s Crop Protection Cooperative Society will prepare ‘Swargarath’ for the convenience of villagers…!

ममुराबाद येथे नुकतीच स्मशानभूमी कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, स्मशानभूमीचे अंतर हे गावापासून बरेच लांब आहे. ही स्थिती लक्षात घेता बारमाही उपयोगी पडणारा स्वर्गरथ तयार करण्याच्या दृष्टीने पीक संरक्षण संस्थेने पुढाकार घ्यावा, असा प्रस्ताव सभेपुढे आला होता. त्यावर विस्तृत चर्चा करून संस्थेचे चेअरमन भरत शिंदे तसेच व्हाईस चेअरमन सुकदेव सावकारे यांच्यासह सर्व संचालक व सभासदांनी गावाच्या सोयीसाठी स्वर्गरथ तयार करण्यास हरकत नसल्याचे नमूद केले. सभेवेळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गावंडे, मधुकर चौधरी, उल्हास कोलते आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव किशोर चौधरी यांनी प्रास्ताविक व विषय वाचन केले.

चालू आर्थिक वर्षात ममुराबाद पीक संस्थेची वसुली ८०.८१ टक्के इतकी झाली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला अ वर्ग प्राप्त झाला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच संचालक व सचिव यांना जळगाव जिल्हा सहकारी पीक संरक्षण संस्थांच्या फेडरेशनकडून गौरविण्यातही आले आहे. दरम्यान, पीक संस्थेच्या वार्षिक सभेच्या ठिकाणी आगामी काळात जंगल चराईसाठी देणेबाबत तसेच वैधानिक लेखा परीक्षणासाठी शासनाने प्रसिद्ध केलेल्या पॅनेलवर परीक्षकांची नियुक्ती करणेबाबत चर्चा करण्यात आली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button