Jalgaon News : जळगावमध्ये महाविकास आघाडी आक्रमक; महायुतीने राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध…!

Jalgaon News : भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे तसेच आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात नुकतेच आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात गुरूवारी (ता.१९) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रसंगी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Jalgaon News : Mahavikas Aghadi aggressive in Jalgaon; Mahayutti’s statement against Rahul Gandhi protested…!

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर अध्यक्ष रिकू चौधरी तसेच अशोक लाडवंजारी, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, रमेश पाटील, सुनील माळी, अनिल पवार आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

भाजपच्या नेत्यांकडून पाठराखण केली जात असल्यामुळेच महायुतीचे खासदार व आमदार हे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरण्याची हिंमत करत आहेत. संविधान वाचवण्याची भूमिका आणि जातनिहाय जनगणनेची मागणी राहुल गांधी यांनी केल्यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. महायुतीच्या वाचाळ वीरांना वेळीच आवर न घातल्यास जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे यावेळी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, जयश्री महाजन, मंगला पाटील म्हणाल्या.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button