Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटणार; मोठ्या प्रकल्पांमध्ये ८० टक्के साठा…!

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा, हतनूर आणि वाघुर या मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये आतापर्यंत सुमारे ८० टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवार (ता.०४) अखेर गिरणा धरणात ९६.०८ टक्के, वाघूर धरणात ९५.३९ टक्के आणि तापी नदीवरील हतनूर धरणात ३२.७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. आवक वाढल्याने तिन्ही प्रकल्पांमधून नद्यांच्या पात्रात सांडव्यातून पाणी सुद्धा सोडण्यात आले आहे.

Jalgaon News : Jalgaon District’s Water Worry Solved; 80 percent stock in big projects…!

जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात असून, त्यामुळे सांडव्यातून सुमारे ९८८८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय गिरणा धरणाचे ०४ दरवाजे ०.३ मीटरने उघडण्यात आले असून, त्यामुळे सांडव्यातून ४८८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या होत आहे. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचेही ०२ दरवाजे ०.२ मीटरने उघडण्यात आले असून, सांडव्यातून ३२६८.०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

मध्यम प्रकल्पांमध्ये तुलनेत कमी पाणीसाठा

मोठ्या प्रकल्पांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ५८.६५ टक्केच पाणीसाठा झाल्याची माहिती मिळाली आहे. पैकी बोरी धरणात आतापर्यंत १०० टक्के पाणीसाठा झाला असून, ०२ दरवाजे ०.३ मीटरने आणि ०१ दरवाजा ०.२ मीटरने उघडण्यात आल्याने सांडव्यातून २४३८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीवरील शेळगाव बॅरेजचे देखील १० दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले असून, त्यामुळे ९६०१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोर प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सुकी, अभोरा, मंगरूळ, अग्नावती, तोंडापूर हे मध्यम प्रकल्प देखील १०० टक्के भरले आहेत. या तुलनेत हिवरा, बहुळा, अंजनी, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणीसाठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे संबंधित मध्यम प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांमधील पाण्याची चिंता अजुनही मिटलेली नाही.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button