Jalgaon News : जुन्या जळगावातून भाजप उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची दमदार सुरूवात…!
Jalgaon News : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे महायुती उमेदवार आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची दमदार सुरुवात मंगळवारी जुन्या जळगावमधील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे झाली. प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत आ.भोळे यांनी प्रचाराचा नारळ फोडून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.
Jalgaon News : BJP candidate MLA Rajumama Bhole’s campaign in old Jalgaon starts strong…!
प्रचाराची सुरुवात होताच आमदार श्री.भोळे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या जळगावातील विविध भागांतून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ठिकठिकाणी नागरिकांनी औक्षण करून आणि पुष्पहार घालून राजूमामा भोळे यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांनी “राजूमामा आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रचार रॅलीदरम्यान अनेक भागात त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत होता. प्रचाराच्या निमित्ताने आ.भोळे यांनी जनतेला आपले कार्य, विकासाचे उद्दिष्ट आणि आगामी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी असलेली योजनांची माहिती दिली.
यांची होती प्रचार रॅलीत उपस्थिती
राजूमामा भोळे यांच्या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाठी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना शिंदे गटाचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी, माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव मेटकर, भागवत भंगाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक दोनचे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्रमांक तीनचे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक अजित राणे, मनोज काळे, डॉ.वीरेन खडके, डॉ.वैभव पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, गायत्री राणे, सरिता नेरकर, जितेंद्र मराठे, भगत बालाणि, राजेंद्र घुगे पाटील, प्रवीण कोल्हे, मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, मनोज काळे, बंटी खडके, जयेश भावसार, ललित चौधरी, आशिष सपकाळे, राहुल वाघ, चित्रा मालपाणी, दीप्ती चिरमाडे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, पियुष कोल्हे, माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडीचे शोभाताई चौधरी, आरपीआय आठवले गटाचे राजू मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.