Jalgaon News : मोठी बातमी; जळगाव जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार ऐवजी ‘या’ दिवशी जाहीर..!
Jalgaon News : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी यंदा सोमवारी (ता.१६) दर्शविण्यात आली आहे. या दिवशी मुस्लिम बांधवांकडून जुलूस देखील काढण्यात येतो. मात्र, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता.१७) अनंत चतुर्दशी असल्याने सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी बुधवारी (ता.१८) जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती बुधवारी जाहीर करण्यात आली आहे.
Jalgaon News : Big news; Eid-e-Milad holiday announced in Jalgaon district on ‘this’ day instead of Monday..!
दरम्यान, मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची तारीख लक्षात घेऊन सोमवारी (ता.१६) जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी (ता.१८) जाहीर करावी. त्याबाबतचा निर्णय स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असेही राज्यपालांच्या आदेशावरून काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. याअनुशंगाने जळगाव जिल्ह्यात सोमवार, दि १६ सप्टेंबर २०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन, ती आता बुधवार, दि १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.