Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गैरहजर आमदारांसह माजी मंत्र्यांवर होणार कारवाई ?

सभासदांनी चेअरमनला विचारला जाब

Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले, परंतु सभासदांच्या प्रश्नांमुळे अनेकवेळा खुद्द चेअरमन कोंडीत सापडले. एका सभासदाने तर सभेला गैरहजर असलेल्या बँकेच्या संचालकांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. विशेषतः, चार आमदार आणि चार माजी मंत्री संचालक असल्याने त्यांच्यावर किती सभांना गैरहजर राहिल्यास कारवाई होते, याबाबत थेट जाब विचारला.

Jalgaon News: Action will be taken against MLAs and former ministers absent from the annual meeting of Jalgaon District Co-operative Bank?

दरम्यान, चेअरमन संजय पवार यांनी सभासदांना उत्तर देताना त्यांच्या ठेवीबाबत प्रश्न विचारला, ज्यामुळे सभेत काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एका सभासदाने वार्षिक अहवालात छापलेल्या फोटोंचा दाखला देत आधी संबंधित संचालक मंडळाच्या ठेवी जाहीर करण्याची मागणी केली. शेवटी या मुद्द्यांवर कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने बरेच सभासद असमाधानी राहिले. सभेला बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा ठराव करण्याची मागणी

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत. या प्रकरणात कंत्राटदार ते मंत्री यांनी कमिशन घेतल्याचा आरोप झाला असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी विशेष ठराव करण्याची मागणी देखील जळगाव जिल्हा बँकेच्या सभेत अनेक सभासदांकडून करण्यात आली. त्यासाठी बऱ्याच जणांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button