Jalgaon News : जळगावमध्ये महामार्गावरील खड्डे न बुजणाऱ्या ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांची ‘मनसे’कडून आरती…!
Jalgaon News : जळगावमधील महामार्गाला समांतर रस्ता तयार करण्यासह जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा दखल घेतली नाही म्हणून मनसेने आज अनोखे आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या प्रकल्प प्रमुखांची थेट आरती केल्याने मोठी खळबळ देखील उडाली.
Jalgaon News : Aarti from ‘MNS’ to ‘Nhai’ officials who are not filling the potholes on the highway in Jalgaon…!
जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, गेल्या आठवड्याभरात तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वारंवार आंदोलन करून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जळगाव येथील प्रकल्प प्रमुख शिवाजी पवार यांची कार्यालयात जाऊन आरती केली. महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना रस्ते बनवण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे आम्ही विघ्नहर्ता गणपती बाप्पाला घातले आहे. महामार्गाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास लवकरच मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव महानगर प्रमुख आशिष सपकाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.