Jalgaon News : जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याने संपविले जीवन…!

Jalgaon News : जळगावमधील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहात अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्याने जीवन संपविल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. प्रतीक विजयराव गोरडे (वय १९,रा.शिरसगाव कसबा, जि.अमरावती) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दोनच दिवसांपूर्वी वसतीगृहात दाखल झालेला होता.

Jalgaon News : A student ended his life in the hostel of North Maharashtra University in Jalgaon…!

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान विभागात बी.टेक प्रथम वर्षासाठी प्रतीक गोरडे याने प्रवेश घेतला होता. त्यासाठी प्रतीक हा वसतीगृह क्रमांक तीनमधील ४४७ मध्ये दोन दिवसांपूर्वी राहण्यास आला होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्याच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहात स्थापन केलेल्या गणपतीची आरती केली. त्यानंतर जेवण करून विद्यार्थी पुन्हा वसतीगृहाकडे परतले, तेव्हा प्रतीकच्या खोलीचा दरवाजा बंद होता. बराच वेळ आतून प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी खिडकीची काच फोडून पाहिल्यावर त्यांना प्रतीकने गळफास घेतल्याचे दिसून आले.

प्रतिकने बुधवारी सकाळी गादी व इतर साहित्य खरेदी केले होते

प्रतिकला तातडीने विद्यापीठाच्या रूग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. दरम्यान, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, डॉ.सारंग आणि सुरक्षा निरीक्षकांनी घटनास्थळी तसेच शासकीय रूग्णालयात भेट दिली. पाळधी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व कर्मचारी देखील दाखल झाले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिकने बुधवारी सकाळी गादी व इतर साहित्य खरेदी केले होते. दिवसभर तो व्यवस्थित होता. मात्र, रात्री त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. विद्यापीठ परिसरात त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button