जळगाव शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निषेधार्थ भाजपचे जोडे मारो आंदोलन..!
जळगाव । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून चिखलाने भरलेले पाय धुवून घेतल्याचा प्रकार नुकताच घडला. पटोले यांच्या त्या कृतीचा निषेध जळगाव महानगर भाजपातर्फे आज बुधवारी (ता.19) करण्यात आला. प्रसंगी पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. (Jalgaon News )
भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखा वर्मा, जळगाव लोकसभा प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी तसेच महानगर सरचिटणीस अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, सरोजा पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखा कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, माजी महापौर भारती सोनवणे, महेश पाटील, नूर मोहम्मद, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, पवन खंबायत, नीला चौधरी, पंकज जैन, दीपमाला काळे, संजय शिंदे, राहुल घोरपडे, सुनील सरोदे, मनोज बोकाळे, शक्ती महाजन, महेश कापुरे, विजय साखला, दत्ता कुलकर्णी, आनंद सपकाळे, अक्षय जेजुरीकर, विकी सोनार, सागर जाधव यांच्यासह प्रदेश, जिल्हा व मंडळ पदाधिकारी, महिला मोर्चा व युवा मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.