जळगावमध्ये वन विभाग, युथ फॉर नेचर कंजर्वेशन फाउंडेशनतर्फे पाच हजार रोपांचे वाटप

जळगाव टुडे । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात युथ फॉर नेचर कंजर्वेशन फाउंडेशन आणि यावल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौकात वड, पिंपळ, उंबर, सीताफळ, चिंच, आवळा, रामफळ, कडुनिंब, जांभूळ, बेहडा, बेल, लिंबू, शेवगा अशा सुमारे पाच हजार रोपांचे वाटप झाले. विशेष म्हणजे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी त्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. (Jalgaon News)

जळगाव शहर व जिल्ह्यातील उन्हाळ्याचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील ज्या जबाबदार नागरिकांकडे झाड लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्यांनी प्रत्येकी एक झाड लावून ते वाढवले तर लाखो झाडे वाढतील. पर्यावरण वृद्धीला चालना मिळून पुढच्या उन्हाळ्यात आपल्या जळगावचे तापमान कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे पाऊस सुद्धा जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी युथ फॉर नेचर कंजर्वेशन या संस्थेतर्फे करण्यात आले.

याप्रसंगी बहुउपयोगी अशी वड, पिंपळ, उंबर, सीताफळ, चिंच, आवळा, रामफळ,कडुनिंब, जांभूळ, बेहडा, बेल, लिंबू, शेवगा अशा विविध प्रकारच्या पाच हजार रोपांचे वाटप करण्यात आले. नागरिकांना संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या ट्री बँक, सीड बॉल कार्यशाळा, जलसंधारण या विविध उपक्रमांची माहिती देऊन रोपांचे संगोपन करण्यासाठी शपथपत्र लिहून घेण्यात आले. या कार्यक्रमाला यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, यावल पूर्वचे आरएफओ स्वप्नील फटांगरे, यावल पश्चिमचे आरएफओ सुनील भिलावे यांचेसह युथ फॉर नेचर कंजर्वेशन संस्थेचे बालेश कोतवाल, गिरीश नारखेडे, रणजित पाटील, हर्षल नारखेडे, अमित नारखेडे, सोहम खडके, वैभव भोळे, युवराज बारी, डॉ श्रुती कोतवाल, भाग्यश्री पाटील, गुंजन नारखेडे, रोहित बडगुजर आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button